सत्ता चालविता येत नाही-पुण्याचा विकास मार्च 2020 पासून ठप्प
पुणे- महापालिका आयुक्त महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचे हि ऐकत नाहीत , त्यामुळे ते विकासाच्या कामात अडथळे ठरत आहेत असे वक्तव्य आज स्थायी समिती अध्यक्षांनी केले म्हणजे हि तर सत्ताधारी भाजपच्या अपयशाची आणि पुण्यात कोणतीही नवीन विकास कामे न केल्याची स्पष्ट कबुलीच आहे असा प्रहर आज स्थायी समिती अध्यक्ष यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते , महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केला आहे .
आबा बागुल पुढे म्हणाले कि,’ मुळात वित्तीय समितीची स्थापना कायदेशीर आहे का याची तपासणी करा,आज वित्तीय समिती प्रशासन रद्द करत नाही यामुळे सत्ताधारी पक्षाला स्थायी समितीवर बहिष्कार टाकावा लागला ही बाब सत्ता चालविता येत नाही याची कबुलीच आहे. पुण्याचा विकास मार्च 2020 पासून ठप्प झाला असून आम्ही वेळोवेळी विकासकामे चालू करा अशी मागणी केलेली आहे .पुणेकरांनी मिळकत कर वेळेत भरला असून त्यांना पायाभूत सुविधा व विकासकामे यापासून वंचित ठेवणे योग्य नाहीव एकूणच भाजप अपयशी ठरल्याचे आज सिद्ध झाले आहे.