- तब्बल १४३ रक्तदात्यांनी केलं रक्तदान.
पुणे : रक्तदान हेच जीवनदान आहे, रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे असतानाच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊनमुळे पुण्यात रक्ताचा कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांसह अन्य रुग्णांनाही रक्ताची नितांत आवश्यकता आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावं या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पर्वती मतदारसंघ आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून रेड क्रास ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये तब्बल १४३ बँगा रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रक्तदान शिबिराची नियोजित दोन वाजताची वेळ वाढवून पाच पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान यामधील अनेक रक्तदात्यांना एचबी आणि अगोदरच लस घेतली असल्याने परत जावं लागलं, अन्यथा जवळपास दोनशे बँगा रक्त संकलन झाले असते. रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास हेडफोन तसेच वाफेचे मशिन भेट देण्यात आले.
“अनेक सेवाभावी संस्था, गैरसरकारी सामाजिक संस्था आणि सामान्य माणसांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच देशात आवश्यक तेवढा रक्त साठा उपलब्ध होईल”, असं कळकळीचे आवाहन नगरसेवक महेश वाबळे यांनी केले होते. नगरसेवक वाबळे यांच्या आवाहनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत वाबळे यांच्या कार्याचे कौतुक केलं.
यावेळी पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, महानगर सेवशिक्षण प्रमुख महेश मानेकर, सहकार्यवाह मा. राजाभाऊ पांनगावे, पद्मवतीनगर कार्यवाह, प्रतिक गोरे, संदिप लोणकर (सरचिटणीस भा ज पा पुणे) ,जितेंद्र पोळेकर अध्यक्ष पर्वती विधानसभा भा ज पा) प्रंशात दिवेकर (संघटन सरचिटणीस पर्वती विधानसभा भा ज पा) हरीष परदेशी, संगिता चौरे, भानुदास ढोबळे, मालती आवघडे, सारिका ठाकर, शैलेश देशपांडे, लहु जागडे, करण देवेंद्र, कैलास मोरे, सागर धडे, प्रसाद शहाडे उपस्थित होते.