नगरसेवक वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश-
पुणे- लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या दोहोंनी समन्वय ठेऊन काम केले तर काय होत नाही ? याची प्रचीती बावधन ला येते आहे. भाजपचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि वनविभागाने दिलेली साथ यामुळे एन डी ए ते बावधन रस्त्यावरील सुमारे १२ एकराच्या डोंगरमाथा डोंगर उतारावर वन उद्यानाच्या निर्मितीला आजपासून प्रारंभ झाला .एकीकडे बिबवेवाडी, धनकवडी ,कात्रज परिसरात जोरदार डोंगर फोडून बांधकामे होत असताना,बाव धन येथे राखली गेलेली हि डोंगर माथा , डोंगर उताराची जागा आणि आता त्यावर होणारे वन उद्यान हे नागरिकांच्या आयुष्याला संजीवनी देणारे ठरणार आहे.
मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर ,उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, सह उपवनसंरक्षक वैभव भालेराव ,वन परिक्षेत्र अधिकारी पी व्ही कापसे यांनी आज या उपक्रमाचा प्रारंभ केला . २० प्रकारची १६०० झाडे येथे लावून पक्षांचा विहार येथे कसा होईल याकडे लक्ष देताना ८०० मीटर ची पाऊल वाट लोकांना येण्याजाण्यासाठी शुध्द ऑक्सिजन मिळविण्यासाठी ठेवण्यात येईल .कॉन्क्रीटणे वेढलेल्या शहरात अशा प्रकारची उद्याने करणे आव्हान होऊन बसले असताना होऊ घातलेले हे उद्यान निर्माण करून ते जतन करणे महत्वाचे ठरणार आहे .