पुणे
भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाच्या पुण्यातील युध्द स्मारकात, काल म्हणजेच 26 जानेवारी 2022 रोजी, 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात, दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांच्या वतीने, पुण्याच्या स्टेशन कमांडर यांनी, हुतात्मा सैनिकांना पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमाचे आयोजन कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले होते.