पुणे: आयकर छापेमारी वर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले धाड टाकलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार तर करू द्यात ,मी कुठे पळून जात नाही , सध्या पाहूणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे ते मी बोलेने, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना दिली. माझ्या वक्तव्याने त्यांच्या कारवाईत कुठे अडथळा येऊ नये म्हणून आज मी बोलण्याची घाई करत नाही असे ते म्हणाले. .पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधताना बोलताना होते.
पुण्यात सोमवारपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करणार आहोत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.पुणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जिल्ह्याबाहेरीलही विद्यार्थी विद्यापीठात येतात. त्यामुळे त्यांनी दोन डोस घेण्याबरोबरच आरटीपीसार टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना कॉलेज आणि हॉस्टेलला देण्यात आल्या आहेत.
नाट्यगृह – सिनेमा २२ ऑक्टोबर पासून सुरु
”पुण्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यानंतर आता सर्व प्रार्थना स्थळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाट्यगृह आणि सिनेमागृह याना २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दसरा झाला कि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होईल. आणि सिनेमा – नाट्यगृह सुरु करण्याचे नियोजन केले जाईल असही ते म्हणाले आहेत. ”
झोपडपट्टीमध्ये लसीकरण वाढवणार
”देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात झोपडपट्ट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे. आपण ७५ तास लसीकरण कार्यक्रम राबवला. आता झोपडपट्टीमध्ये घरोघरी लस देण्याचं प्रयत्न करणार आहोत. ”