पुणे, ता. ११ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा ३५ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शाळा समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना तलाठी यांनी मार्गदर्शन केले. खासगी स्वरूपाची सेमी इंग्रजी माध्यमातील अत्यंत उत्तम शाळा ही जनमानसातील शाळेची प्रतिमा वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. कांबळे यांनी यावेळी केले.