या कार्यक‘माचे ऋनिर्देश पर्यवेक्षक दिलीप रावडे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्रीमती राधिका देशपांडे यांनी केले.
रमनबागेतील बाल वैज्ञानिकांनी साजरा केला राष्ट्रीय विज्ञान दिन
पुणे-
शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रमणबाग प्रशालेमध्ये विज्ञान गूढकथा या कथासंग्रहाचे लेखक व संशोधक श्री. श्रीनिवास शारंगपाणी बालसंशोधकांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.
विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या चराचर सृष्टीतील विज्ञान जाणून घेऊन संशोधक वृत्तीला वाव द्या. वर्गावर्गातून विद्यार्थ्यांनी केलेले उपकरणे, प्रकल्प पाहून त्यांना संशोधक होण्याची प्रेरणा दिली. या वेळी सिल्व्हर झोन ङ्गाउंडेशन यांच्यातर्ङ्गे आयोजित सायन्स ऑलिपियाडमध्ये गोल्ड, सिल्व्हर व ब‘ांझ मेडल प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे श्रीनिवास शारंगपाणी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक‘माच्या प्रास्ताविकात उपमु‘याध्यापिका श्रीमती जयश्री रणखांबे यांनी दैनंदिन जीवनात विज्ञान खूप महत्त्वाचे असून त्याद्वारे विद्यार्थ्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. या कार्यक‘मास शाला प्रमुख श्रीमती तिलोत्तमा रेड्डी यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच शाळेच्या उपमु‘यापिका श्रीमती जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक दिलीप रावडे व सुरेश वरगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक हेमंत पाठक, श्रीमती सिद्धी देशपांडे, श्रीमती वंदना थोरात, श्रीमती सारिका रणदिवे, श्रीमती सुधा लांडे, श्रीमती सुवर्णा केदारी यांनी विज्ञानदिन यशस्वी केला.