पुणे-आज न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मातृ-पितृ पूजन दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला. पारंपारिक पोषाखात व सनईच्या सुरावटीत विद्यार्थ्यांनी आपल्या आई बाबांना हार घालून त्यांचे पाद्यपूजन केले व त्यांचे औक्षण केले. तसेच त्यांना कृतज्ञता पत्र लिहून त्यांच्याप्रती आपल्या सदभावना व्यक्त केल्या पालक व पाल्य यांच्यामधील प्रेम व जिव्हाळा वृद्धिंगत करणारा हा आगळा वेगळा संस्कार या कार्यक‘मातून रुजवण्यात आला. श्रीमती चारुता प्रभुदेसाई यांनी रचलेल्या कृतज्ञता गीताचे गायन श्री. हर्षद गाडगीळ यांनी केले. श्री गणेश देशमुख यांनी आई बाबांचे पूजन करण्याचे प्रयोजन त्यांच्या चिंतनातून मांडले.
ह्या कार्यक‘माची संकल्पना प्रशालेच्या शालाप्रमुख श्रीमती तिलोत्तमा रेड्डी यांची होती. तसेच शालाप्रमुखांनी विद्यार्थ्याने आईबाबांना लिहीलेल्या हृद्य पत्राचे वाचन केले. माननीय उपशालाप्रमुख श्रीमती जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक श्री. दिलीप रावडे व श्री. सुरेश वरगंटीवार यांचे मार्गदर्शन कार्यक‘मास लाभले. सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी यांनी या कार्यक‘मात सहभाग घेतला.