पुणे ः केवळ पुस्तकी ज्ञान देण्यावर भर न देता चौकटीबाहेरचा विचार करणे, नावीन्यपूर्णता, कल्पकता, चिकित्सक वृत्ती हे उद्योजकतेला पोषक असणारे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याच्या उद्देशाने शिक्षण संस्थांनी कार्य केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ उद्योगपती डॉ. अभय ङ्गिरोदिया यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इनक्युबेशन, स्टार्ट-अप, ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट विभागाच्या (आयएसटीपी) वतीने उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळ विकास अधिकारी आणि डीईएसच्या घटक संस्थांच्या प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. फिरोदिया मार्गदर्शन करीत होते. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. संचालक सागर ङ्गडके, ङ्गर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, विभागाचे प्रमुख आदेश गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ङ्गिरोदिया पुढे म्हणाले, ‘जग वेगाने बदलत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क‘ांतीमुळे प्रत्येकाला सहजपणे शिक्षण उपलब्ध होत आहे. या शिक्षणाचा उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयोग करता आला पाहिजे. त्यातून आर्थिक प्रगती झाली पाहिजे. उद्योगात नैतिकतेला महत्त्व आहे.’
शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील परस्पर पूरक गरजांची माहिती व्हावी, त्यांच्यात समन्वय साधता यावा या उद्देशाने परिषदेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. कुंटे यांनी यावेळी दिली. या परिषदेत डीईएस आणि अकरा कंपन्यांमध्ये करार करण्यात आले.विभाग प्रमुख नंदिनी कोठारकर, प्रा. अंजली नाईक, स्वाती सातपुते, प्राजक्ता प्रधान यांनी संयोजन केले.