- नवरात्र उत्सव दि. २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०१९
- घटस्थापना रविवार दि. २९ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.३० वाजता
- सकाळी ६ ते ९ अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
- दररोज सकाळी १० व रात्री ९ वा. महाआरती
- गणपती मंदिरात रोज दुपारी भजने
- सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता नवचंडी होम
- मंगळवार ८ ऑक्टोबर दुपारी ५ पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, झेलीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकर्यांचा सहभाग हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
- श्री अभिषेक अरुण अनगळ या वर्षीचे सालकरी
- पौरोहित्य श्री नारायण कानडे गुरुजी
- नवरात्र उत्सवानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु करणार, यात सरकता जीना ची सोय उपलब्ध करणार. त्यामुळे वृद्ध, अपंग यांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार
- यंदाच्या नवरात्र उत्सवात स्तनपान कक्षाची व्यवस्था श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे
- श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे सांगली व कोल्हापुर जिल्हातील पुरग्रस्तांसाठी रु. ३,००,०००/- ची देणगी मु‘यमंत्री रिलीफ फंडाला देण्यात आली
- पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल
- पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदीरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
- व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
- सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
- महानगर पालिकेमार्ङ्गत किटनकनाशकांची फवारणी, कचरा उचलणेसाठी जादा कंटेनरची व्यवस्था, पाण्यात जंतुनाशके टाकणे
- ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
- अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्यापर्यंत)
- २४ अवर्स सर्व्हिसेसतर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच ८ तासाच्या ड्युटीमध्ये ६ डॉक्टर असे २४ तासात १८ डॉक्टर भाविकांच्या सेवेला असणार आहेत. औषधोपचार मोङ्गत दिले जाणार आहेत.
- पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मेदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
- भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेटची व्यवस्था
- मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्यात
- मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था
- सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटीचा मंदिराच्या परिसरात विमा
- यात्रेतील रांगेत उभे रहाणार्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था
- यंदा पुरूषांसाठीचे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे पूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.
- यंदा मंदिराच्या मुख्य गाभार्यात चांदीचे छत बसविण्यात आले आहे
- दि. ३/१२/२०१९ रोजी World disabilit day निमित्त रोटरी क्लब ऑफ खडकी यांचे तर्फे देवस्थानच्या परिसरात सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत जयपूर फुट कँप आयोजित करण्यात आला आहे. पोलियो ग्रस्तांना मोफत कॅलीपर्स आणि कुबड्या दिल्याजातील. सर्व वयोगटांच्या व्यक्तींनी शिबीराचा लाभ घ्यावा.