समता परिषदेला ‘राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ जाहीर
पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ मुंबईतील झोपडपट्टी व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये रचनात्मक विधायक कार्य करणार्या ‘समता परिषदे’ला जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. नेहरू उमराणी यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. २७ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अम्फीथिएटरमध्ये हा कार्यक‘म होणार आहे. सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, परिषद व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी दिल्लीच्या एकल विद्यालय फाउंडेशनला आणि दुसरा पुरस्कार रा. स्व. संघ जनकल्याण समितीला देण्यात आला होता.