पुणे-प्रभाग माझा माझी जबाबदारी ,इथे कोणी उपाशी राहणार नाही ..अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला पहिला प्रतिसाद देत महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी उद्या प्रभागातील गरजूंच्या घरी किराना माल पोहोचविण्याचा निर्धार केला आहे .या साठी आज त्यांनी जय्यत तयारी केली आहे. बासमती तांदूळ ,तुरडाळ ,साखर अशा किराणा मालाच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ते आमदार चंद्रकांतदादा पाटील, माधुरी मिसाळ यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ करीत सुरु करणार आहेत . यावेळी जमावबंदी आणि कोरोना संदर्भात सर्व शासकीय नियम आणि स्वतः सह जनसुरक्षा जनआरोग्य लक्षात घेऊन घरोघरी जीवनावश्यक वस्तू पोहोचविणार आहेत .