पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत,सलग दोन वर्षे होऊ न शकलेला,श्री.विद्या उत्तेजक ट्रस्टचा,सन 2020/2021 चा गुण गौरव समारंभ “कर्नाटक हायस्कूलच्या, एरंडवणे येथील ऑडोटोरिअम मध्ये” उत्साहात साजरा करण्यात आला.ज्याची सर्वच ज्ञाती बांधव, कौतुकास्पद कामगिरी केलेले मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थीनीं, आतुरतेने वाट पाहत असतात असा पुण्यातील हा समारंभ यावेळी कोरोनाचे नियम पाळत च संपन्न झाला .समाजातील 102 गुणवंत विद्यार्थी / विद्यार्थीनींना त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल यावेळी “स्मृतिचिन्ह ” देवून गौरविण्यात आले.
अनिल गांधी,यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे BVG समुहाचे प्रमुख हनुमंतराव गायकवाड,व सुप्रसिध्द ह्रदय रोग तज्ञ डॉ.अजित मेहता,सौ.सुनिता शेठ,डॉ.श्री.संदीप बुटाला,CA रोहीत शहा ई. मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात सौ.विद्या शेखर मेहता,सौ.प्रज्ञा राजेश शेठ यांच्या स्वागत गीताने करण्यात आली.
सत्कार समितीचे अध्यक्ष अनिल गांधी यांनी प्रास्ताविक केले,तर संस्थेच्या कार्याचा व भविष्यकालीन योजनेचा आढावा विश्वस्त डॉ .सतिश देसाई यांनी घेतला.प्रमुख पाहुणे गायकवाड व मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव करून, सत्कार्थीना ,उपस्थित प्रेक्षकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करून समाजाचे भुषण अजिक्य धारीया,डॉ. निलेश गुजर,यांचा विशेष सत्कार केला.विश्वस्त अरूण शेठ,चद्रशेखर शेठ,कांतीलाल शहा ,विजयकुमार शेठ, सुरेश शेठ ई.मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सौ.सुनिता शेठ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केल्यावर , डॉ .सदिप बुटाला यांनी आभार मानले.
सौ. स्वाती धारीया व प्रणव शेठ यांनी सुत्र संचालन केले.राष्ट्रगित झाल्यावर हा कार्यक्रम समाप्त झाला.