गेल्या १० वर्षांपासून मिळकतकर भरून देखील माझ्या प्रभागातील नागरिकांना पाण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चिंतामणी नगर, गुलामआली नगर, ससाणे वस्ती, नेहरू पार्क, काळेपडळ, बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड, ईसीपी वास्तू, ड्रिम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, पांगारे मळा, सनश्री, साळुंखे विहार, भीमनगर, साई विहार कॉलनी व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने शिवसेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकारी, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे*यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाइलने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हे टाळे ठोको आंदोलनकरण्यात आले
महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकले -पिण्याच्या पाण्याचा प्रश्न..पाणी रे पाणी .(व्हिडीओ).
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात .. सारी धरणे तुडुंब भरलीत ,इथे नद्या दुथडी भरून वाहताहेत ..आणि लोकांना दिवसा आड पाणी पुरवठा होतो आहे तो हि कमी दाबाने ..महंमदवाडी-कौसरबाग या २६ क्रमांकाच्याप्रभागाची अवस्था बदलेना ..आणि शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांना मुख्य सभेत वारंवार आवाज उठवून हि अधिकारी कामे करेनात ..अखेर आज त्यांच्या नागरी आंदोलनात ..आंदोलकांनी चक्क महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप ठोकले … काही काळ. त्यांनी हे कुलूप तसेच ठेवले मात्र नाना भानगिरे यांच्या विनंतीवरून नंतर या कुलुपाची चावी सुरक्षा रक्षकांकडे देवून निषेध व्यक्त केला . अखेरीस अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा आंदोलकांना भेटले आणि पाणीपुरवठा प्रमुख, तसेच अन्य अधिकारी यांना या प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले ..