पुणे, दि. ४ ऑगस्ट : शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राचे (जेनेरिक मेडिकल) उद्घाटन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. राजीव ढेरे यांच्या शुभहस्ते व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. दीपक शहा यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमास गोपाळ राठी, कार्यकारी विश्वस्त, डॉ. र.ना. गांगल, विश्वस्त, डॉ. गिरीश टिल्लू, विश्वस्त, रतन राठी, तसेच रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंद देशपांडे, उपअधीक्षक डॉ. कल्याणी भट उपस्थित होते.सर्वसामान्यांना जेनेरिक औषधे कशी गुणवत्ता पूर्ण आहेत, त्यांना ही योजना कशी लाभदायी आहे व त्यामुळे रोजच्या औषधांचा खर्च कसा आटोक्यात येईल याचे प्रतिपादन डॉ. राजीवजी ढेरे यांनी केले.डॉ. दीपक शहा यांनी संस्थेची पाहणी केल्यानंतर संस्थेच्या कामाकाजाविषयी अत्यंत समाधान व्यक्त करुन संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यकारी विश्वस्त श्री. गोपाळ राठी यांनी संस्थेची शतकाकडे चाललेली वाटचाल विदित करुन संस्था यापुढेही सर्वसामान्यांना वेगवेगळ्या सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी भट, उपअधिक्षक यांनी, तर कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन डॉ. धनंजय म्हसाडे यांनी केले.