पुणे, 9 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, सार्थ बनसोडे, साहिल तांबट यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आजचा दिवस गाजवला. डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ पहिल्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर सार्थ बनसोडे याने आठव्या मानांकित गुजरातच्या यग्ना पटेलचा 6-3, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. बिगरमानांकीत साहिल तांबटने चौथ्या मानांकित आपला राज्य सहकारी प्रणव कोरडेचे आव्हान 6-4, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्णव पापरकर याने सातव्या मानांकित जय पवारचा 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात प्रिशा शिंदे हिने चौथ्या मानांकित श्रीया श्रीनिवासचा 6-0,6-0 असा एकतर्फी पराभव केला. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित रुमा गायकवारीने रिद्धी शिंदेचा 6-0, 6-1 असा तर, क्वालिफायर श्रेया पठारेने साईइति वराडकरचा 6-2, 6-2 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.अर्जुन गोहड(महा)3-6, 6-2, 6-4;
आर्य कळंबेल्ला(कर्नाटक)वि.वि.अनिष्ट रांजळकर(महा)6-4, 6-4;आर्यन कोटस्थाने(महा)वि.वि.वेदांत रावळ(महा)3-6, 6-4, 7-5;सार्थ बनसोडे(महा)वि.वि.यग्ना पटेल(गुजरात)[8] 6-3, 6-1;साहिल तांबट(महा)वि.वि.प्रणव कोरडे(महा)[4] 6-4, 4-6, 6-2;निशित रहाणे(महा)वि.वि.तेजल पाल(महा) 6-0, 6-1;ओजस दबस(महा)वि.वि.सिद्धार्थ मराठे(महा)7-6(2), 6-7(3), 6-4;अर्णव पापरकर(महा)वि.वि.जय पवार(महा)[7] 6-4, 6-3;अभिराम निलाखे(महा)वि.वि.वेद शेट्टी(कर्नाटक)6-0, 6-2;तनिष्क जाधव(महा)वि.वि.पार्थ देवरुखकर(महा)6-2, 2-6, 6-4;
मुली:
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.रिद्धी शिंदे(महा)6-0, 6-1;श्रेया पठारे(महा)वि.वि.साईइति वराडकर 6-2, 6-2;प्रिशा शिंदे(महा)वि.वि.श्रीया श्रीनिवास(महा)[4] 6-0,6-0;पुरेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4]वि.वि.ईश्वरी मार्कंडे(महा)6-0, 6-0.