पुणे- शिवसेनेत भाजपच्या देवेन्द्रजींच्या आणि अमित शहांच्या निर्देशावरून कब्बडी सुरु असल्याचे राजकीय वर्तुळात खुमासदार वृत्त सातत्याने बोलले जात असताना पुण्याच्या कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ज्यांनी आयुष्याची सर्वाधिक नव्हे तर बहुधा कारकिर्दीची सर्वच वर्षे नगरसेवक म्हणूनच जनसेवेत स्वतःला झोकून दिले ते सध्या मात्र महापालिकेवर प्रशासक आल्यावरही जनतेच्या विविध कामात अडकवून घेताना दिसत आहेत .
त्यांच्याच मार्गदर्शना खाली उभारलेल्या आणि सुरु असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी इ लर्निंग स्कूल मध्ये शाळाप्रवेश आता फुल झाल्याचे बोलले जाते .
आंतरराष्ट्रीय स्तरावर या शाळेचा लौकिक पोहोचला आहे या शाळेत या नेत्याने चक्क विद्यार्थ्यांच्या कब्बडी खेळातही मन रामविल्याचे दिसून आले आहे .
त्यांच्या या कब्बडी खेळात त्यांना विद्यार्थ्यांनी बाद केले कि विद्याथ्यांना त्यांनी बाद केले याहून खेळाची रंगत मात्र त्यांनी भलतीच वाढवून दिल्याने यावेळी येथील वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता दिसून आली ,कोरोनाच्या काळानंतर अशा प्रकारची प्रसन्नता प्रत्येक शाळा शाळात बहरून यावी असे कोणी म्हटले तर वावगे ठरू नये … पहा हि छायाचित्रे ..
माजी उपमहापौर ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आबा बागुल यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत उभ्या केलेल्या स्व्पान्पुर्ती प्रकल्पातील अशाच प्रकल्पात जाऊन ते माहिती घेऊन ते व्यवस्थित चालत आहेत कि नाहीत यावर आपला वेळ खर्ची घालीत आहेत आणि अशाच स्थळी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या हि जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात रमताना दिसत आहेत .