पुणे-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित स्वररंग जिल्हास्तीरीय आंतरमहाविद्यालयीन युवक मोहोत्सावाचे आयोजन खडकी एज्युकेशन सोसायटी चे टिकाराम जगन्नाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी येथे करण्यात आले होते. या ठिकाणी पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादित केले. पश्चीमात्या वैयक्तिक संगीत स्पर्धेमध्ये कु. प्रेरणा कापडनीस हिने प्रथम स्थान पटकाविले. चिकट कला कात्रण कला (कोलाज) स्पर्धेमध्ये कु.गौतमी खेंगरे हिची प्रथम स्थानी निवड झाली तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. गुणवंत बुरले, श्रुष्टी शेलार, संस्कार गांधले यांनी द्वितीय स्थानी निवड झाली. या विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास मंडळ विभाग व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा.सुप्रिया शिंदे व प्रा. संदीप राऊत यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. विद्यार्थ्यांनी या मिळवलेल्या यशाबद्दल स्पर्धांमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड,प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे ,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्या दिल्या.