पुणे दिनांक 25 फेब्रुवारी : नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या विकास निधीतून बावधन येथील अमर जवान चौकामध्ये भारतीय सैन्य दलाशी निगडीत स्मारक व अमर जवान वाचनालयाचे उद्घाटन तसेच अटल योजनेंतर्गत कोथरूड डेपो ते बावधन ते कोथरूड डेपो या वर्तुळ मार्गावर दोन अटल बससेवेचा शुभारंभ खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार गिरीश बापट म्हणाले की, भारतीय सैन्य दलाबाबत मनामध्ये असणारे प्रेम नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी उभारलेल्या स्मारकातून जनतेसमोर व्यक्त केले आहे. 5 रूपया मध्ये 5 किलोमीटर अटल बस सेवेच्या संकल्पनेतून नागरिकांच्या हितासाठी दोन बससेवा वेडेपाटील यांच्या माध्यमातून बावधनकरांसाठी आज पासून सुरू करण्यात आल्या आहेत. निवडून येण्यापूर्वी आपण जनतेला दिलेल्या वचनपूर्तीचे समाधान सर्वात महत्वाचे असते .वेडेपाटील आणि भाजपा चे नगरसेवकांनी त्याची कास धरली आहे याचे मला कौतुक आणि आनंद आहे.
बावधन परिसरातील नागरिकांसाठी चालू करण्यात आलेल्या अटल बस क्र. के – 21 मार्ग (कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – लक्ष्मी दत्त चौक – टोयोटा शोरूम – बाळतुका कोर्नर – चेलाराम हॉस्पिटल – सूर्यदत्ता कॉलेज – डीएसके रानवारा – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो) के – 21 (ए) मार्ग (कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – टिन्सेल टाउन – विज्ञांननगर चौक – सिद्धिविनायक चौक – बँक ऑफ महाराष्ट्र – डी पॅलेस – बावधन पोलिस चौकी – रामनगर कॉलनी – बावधन पोलिस चौकी – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो)
सदर कार्यक्रमाप्रसंगी भा.ज.पा पुणे शहर सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दांगट नगरसेवक किरण दगडे, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका डों. श्रद्धा प्रभूणे-पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, भाजपा क्र. 10 चे अध्यक्ष सागर कडू, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडी चे अध्यक्ष धनंजय दगडे, सहकार्यालयीन मंत्री राजेश कुलकर्णी, भाजपा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष मंदार घुले, राजेश मनगिरे, राजाभाऊ जोरी, अजित शिवगण, रूपेश भोसले, रुगाराम चौधरी, केसरम चौधरी, ह.भ.प. शंकर वेडे, ह.भ.प.कान्हू वेडे, ह.भ.प. अरुण वेडे, ह.भ.प. बंडू माताळे, सुरेश गुरव, सुभाष वाघमारे, बाळासाहेब कुडापणे, दिलीप पुराणिक, कल्याणी कलावंत, निधी भाटीया, ऊज्वला पाटील, विजय करंजावणे, तसेच बावधन ज्येष्ठ नागरिक संघ व बावधन हास्य क्लबचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे व विजय करंजावणे यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.