कमिशनर व्यंकटेशम साहेब इकडे लक्ष द्या हो….
पुणे -शहरात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमधे वाढ झाली आहे.अशातच असंख्य लोकांना मोबाईल वर निनावी एस एम एस येत असून यात आपल्या मित्राने आपल्यासाठी एक हजार रुपये पाठवले असून ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा असा मजकूर आहे.हा सर्व प्रकार संशयास्पद असून याद्वारे कोणा व्यक्तीची फसवणूक होवु नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.हे एसएमएस कोठून येतात कोण पाठवीत आहे याचा तपास करून ते पाठविणाऱ्याचा मागोवा घेऊन त्याला तातडीने पकडावे अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष ,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांन केली आहे .
या साठी त्यांनी स्वतःला आलेल्या मेसेज चे स्क्रीन शॉट सोबत पाठविले आहेत .आणि त्यावर योग्य कार्यवाही करावी असे म्हटले आहे .याचबरोबर अश्या प्रकाराबाबत नागरिकांना सावधानता बाळगण्याचा संदेश सोशल मीडिया वर प्रसारित करावा अशी आग्रही मागणीत्यांनी केली आहे .