पुणे-विद्यार्थी स्केटिंग करत तिरंगा हातात घेउन भारत मातेचा जयघोष करत अभिनव पद्धतीने भारतमातेला अभिवादन करत आहेत हे दृश्य रोमांचक असून मी सर्व सहभागी स्केटर्स चे अभिनंदन करतो असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.तर अश्या विविध उपक्रमांनी, कार्यक्रमांनी पुणे शहर ढवळून निघाले असून संपूर्ण शहर तिरंगा मय झाले असल्याचे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले. आज शहरात हर घर तिरंगा फडकताना दिसत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे पुण्याचे वैशिष्ट्य जपणारे असल्याचेही मुळीक म्हणाले. महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या ह्या अभिनव कल्पनेचे ही कौतुक असल्याचे श्री. मुळीक म्हणाले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठी अभिनव तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,संघटनेचे पदाधिकारी प्रशिक्षक प्रमोद काळे,चेतन भांडवलकर,उद्यम बँकेचे संचालक दिलीप उंबरकर,संपदा बँकेचे संचालक जगन्नाथ कुलकर्णी, भाजपा आय टी सेल च्या संयोजक सौ. कल्याणी खर्डेकर इ उपस्थित होते.यावेळी श्री. मुरलीधर मोहोळ व जगदीश मुळीक यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन रॅली चे नेतृत्व केले. सर्व खेळाडूंनी प्रथम स्केटिंग करत,तिरंगा फडकवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व त्यानंतर कोथरूड डी पी रस्त्याने महेश विद्यालय येथे रॅली चा समारोप झाला. आमचे खेळाडू राजू दाभाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेत आहेत,अश्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही अनोखी अभिवादन यात्रा काढण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला याचा आनंद वाटतो असे संदीप खर्डेकर म्हणाले.ही अभिवादन यात्रा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आल्याचे राजू दाभाडे म्हणाले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी काठी वा राष्ट्रध्वज भेट दिल्याचेही राजू दाभाडे म्हणाले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर राजू दाभाडे यांनी आभार प्रदर्शन केले.