महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी नेमका काय केला आहे दावा ,पहा
पुणे- शिवाजीनगर येथील सीओईपी जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पुणे महानगरपालिकेकडून 50
डॉक्टर आणि 120 पॅरा मेडिकल स्टाफ यांची नेमणूक करणेत आलेली आहे. येथे दाखल होणार्या
प्रत्येक रुग्णावर व्यवस्थितरीत्या उपचार करण्यात येत असून त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत
आहे. या कोव्हिड सेंटर मध्ये पुरेशा सोयी सुविधा, अनुभवी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आवश्यक
मनुष्यबळ पुरविण्यात आलेले आहे. आयसीयूसाठी तज्ञ नेमण्यात आलेले असून आवश्यक औषधांचापुरवठा पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. येथे येणार्या रूग्णांच्या उपचारावर वरिष्ठअधिकार्यांचे 24 तास लक्ष रहाणार आहे.
रूग्णांच्या नातेवाईकांसाठी वेटिंग रूमची सोय करण्यात आलेली असून नातेवाईकांना
रुग्णांसंबंधी येणार्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात आलेली आहे असे पुणे
महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) रूबल अगरवाल यांनी सांगितले आहे.