पुणे – महाविकास आघाडी सरकारचा सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागा भरण्याचा निर्णय अनुसूचित जाती,जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग आदी मागासवर्गीय घटकातील कर्मचारी अधिकाऱ्यावर अन्याय करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयावर स्थगिती दिली असून राज्य सरकारने सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागा भरण्याचा फतवा काढून हे बहुजनाचे सरकार नाही गोरगरिबांचे सरकार नाही हे सिद्ध केले आहे.इतर राज्यातील पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे परंतु महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारने आपण स्वतः किती जातीवादी आहोत हेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयावरून सिद्ध होते त्यांच्या या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करून निषेधाच्या घोषणा देवून करण्यात आला.
राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन पदोन्नतीतील आरक्षण कायम करावे तसे न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल या सरकारला खाली खेचुन तिचे मनुवादी मनसुबे चा बुरखा जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने देण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, ॲड. मंदार जोशी, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, ईश्वर ओव्हाळ, रामभाऊ कर्वे, संतोष खरात, मुकेश काळे, राजेश गाडे, महादेव कांबळे, शमशोद्दीन शेख, संदीप धांडोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.