राष्ट्रवादीच्या नितीन कदम आणि त्यांच्या लेकीची कोरोनावर मात
पु णे – जनतेला धीर देणारी, जनहितासाठी सभागृहात वाघिणीची डरकाळी फोडणारी नगरसेविका असली म्हणून काय झाले , अखेर ती एक स्त्री आहे ,एक गृहिणी आहे ,कोरोनाने थेट तिच्या कुटुंबावरच आघात केला अन हि सभागृहातील वाघीण भांबावली पण नेत्यांच्या ,हितचिंतकांच्या आशीर्वादाने भारावली देखील …. सहकारनगर ,पर्वती परिसरातील अश्विनी कदम यांची हि कथा ..व्यथा ..
कोरोनाशी एकूणच पुणे लढा देत असताना जनतेला मदत करण्यासाठी धावाधाव करता करता यांच्यावरच कोरोनाचा घाला झाला अन नितीन कदम अन त्यांची १३ वर्षाची मुलगी गौरवी यांना कोरोनाची लागण झाली त्यांना मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठविले गेले .आणि मुलगा विरेन यास होम आयसोलेशन करण्यात आले. सुदैव एवढेच कि नगरसेविका अश्विनी यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. पण कुटुंबच कोरोनाच्या घेऱ्यात सापडले . आणि मग घराची जबाबदारी , नागरिकांची कामे या फरफटीत नगरसेविकेतील गृहिणी भांबावून गेली . खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे,वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीचे कार्यकते त्यांना वेळोवेळी धीर देऊ लागले ज्या नागरिकांना कदमांची हि व्यथा समजली त्यांनीही धीर द्यायला सुरुवात झाली आणि मग हि भांबावलेली गृहिणी सावरली .आज रुग्णालयातून या बापलेकीला डिस्चार्ज देण्यात आला , हे दोघे घरी आले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले . शरीराने थोडेसे थकलेले कदम या टाळ्यांनी म्हणाले जणू हत्तीचे बळ आले … कोरोनाच्या काळातील असंख्य कथा आणि व्यथेत एका राजकीय कुटुंबातील एका गृहिणीची कथा म्हणून हा किस्सा कायम स्मरणात राहील .- शरद लोणकर, पुणे