पुणे-पीएमपीएमएल च्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या १८ व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४ अशा एकूण २२ अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार समारंभ स्वारगेट येथील मुख्यालयात पार पडला. या सर्व सत्कारमूर्तींचा सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन पीएमपीएमएलचे पास विभाग प्रमुख विक्रम शितोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
◆ प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले विविध पदांवरील सेवक असे :
● वरिष्ठ लिपिक : श्री.विजय दशरथ गुंजाळ
● कंट्रोलर कम चेकर : श्री. शांताराम धोंडिबा गरुड, श्री.शशिकांत ज्ञानदेव कांबळे, श्री. संजय मारुती हुलावळे,श्री. विक्रम हिरोजी जाधव
● नाईक : श्री. विजय वसंतराव निकाळजे
● हेल्पर : श्री. ज्ञानेश्वर मोरू पाडळे, श्री. चंद्रकांत रघुनाथ ढोके, श्री. ज्ञानेश्वर नथु फुगे
● क्लिनर : श्री. मधुकर रामचंद्र वाडेकर, श्री. उत्तम राणोजी ढोरे
● सिनिअर ड्रायव्हर : श्री. लक्ष्मण परसराम दिवेकर
● ड्रायव्हर : श्री. इलियासखान नसरूल्लाखान, श्री. राजेंद्र हरी वाखारे
● कंडक्टर : श्री. दत्तात्रय गणपत धुमाळ, श्री. किशोरकुमार मारुतराव जाधव, श्री. अंगद व्यंकटराव पवार, श्री. गजानन रामचंद्र सदानंद
◆उल्लेखनीय कामगिरी केलेले सेवक असे :
● श्री. चंद्रशेखर कदम, कोथरूड डेपो मॅनेजर
● श्री. राजेश बुनगे, लिपिक, स्वारगेट मुख्यालय
कामगिरी : परिवहन महामंडळास पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पीसीआरए) यांचेमार्फत इंधन बचतीचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम
क्रमांकाचा सार्वजनिक वाहतूक संस्थेचा व स्वारगेट डेपोस इंधन बचतीचा राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
याकामी श्री. कदम यांनी मुख्य समनव्यक म्हणून तर श्री. बुनगे यांनी रेकॉर्ड तयार करणे, पत्रव्यवहार करणे अशी महत्वपूर्ण जबाबदारी
पार पाडली.
●श्री. सचिन गराडे, कंडक्टर क्र. ५५७६, कात्रज आगार
कामगिरी : दि. १४/०७/२०२१ रोजी मार्गावर कर्तव्य बजावत असताना बसमध्ये सापडलेली रोख रक्कम रुपये १०,०२०/-
प्रामाणिकपणे कात्रज डेपोतील हेड क्वार्टरमध्ये जमा केली.