पालिकेचा गलथानपणा अन शिक्षकांचा प्रामाणीकपणा
पुणे- महापालिकेच्या गलथान कारभाराचे एक उदाहरण समोर आले आहे. निवृत्त झालेल्या १९ शिक्षकांचे पगार महापालिकेने त्यांच्या खात्यात रीतसर जमा केले आणि महापालिकेची हि चूक लक्षात येताच संबधित शिक्षकांनी तातडीने हि रक्कम स्वतः हून महापालिकेला जमा केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. दरम्यान महापालिकेच्या अशा गलथान कारभाराचे पडसाद आता उमटणार कि ते ही झाकून ठेवले जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.