पुणे –
शनिवार दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत ऋषिपंचमी निमित्त ‘ऋषितुल्य सेवानिवृत्त शिक्षकांच्या’ पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यंदा रमणबाग प्रशालेच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये ‘अमृत गणेशाची’ प्रतिष्ठापना विधिवत परंपरेला अनुसरून करण्यात आली आहे. आज ऋषिपंचमी निमित्त प्रशालेतून निवृत्त झालेले व वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेले मा. श्री. श्रीधर देव, मा. श्री दत्तात्रेय ऐगळीकर, मा. श्री. दाबके, मा.श्री.मर्चंट, मा.श्री.घाटोळे, मा. श्री. जोग, मा. श्री. आपटे, मा.श्री. विनय कुलकर्णी, मा.श्री. भसे अशा जेष्ठ ऋषितुल्य शिक्षकांचे पूजन विद्यार्थ्यांनी केले. शालासमितीचे अध्यक्ष मा. ॲड. अशोकराव पलांडे आणि शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुनील शिवले यांनी या वयोवृद्ध व सेवाभावी शिक्षकांना मानपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान केला. आदरणीय ऋषींचे अखंड स्मरण विद्यार्थ्याला त्याचे जीवन घडवण्यास सहाय्यक ठरते. असा ऋषी पूजनाचा संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करणारी आपली रमणबाग शाळा एकमेव आहे असे मा.देव सरांनी आवर्जून सांगितले. माणसाला माणूस म्हणून घडवते ते खरे शिक्षण! असे शिक्षण रमणबाग शाळेत दिले जाते. ही अभिमानास्पद बाब आहे असे श्री.ऐगळीकर सरांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. श्री. आपटे सरांनी विद्यार्थ्यांना दैवत मानून शिक्षकांनी कार्य करावे. ध्येय निश्चिती करून कार्य केल्यास ते यशस्वी होते असे मार्गदर्शन केले. मा. श्री. पलांडे सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये ऋषी पंचमी निमित्त ऋषी पूजनाची परंपरा अखंडित चालू ठेवण्याची प्रेरणा उपस्थितांना दिली. प्रशालेचे शालाप्रमुख श्री सुनील शिवले यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील शिक्षकांनीआज ऋषीपंचमी निमित्त तसेच प्रशालेच्या अमृत महोत्सवाच्या प्रित्यर्थ अभिनव उपक्रम केला. ऋषीपंचमीचे औचित्य साधून रमणबाग प्रशालेमधील शिक्षकांनी शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या घरी जाऊन प्रशालेच्या वतीने त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय गणेशोत्सवाचे उपाध्यक्ष श्री. हेमंत पाठक यांनी केले तर गणेशोत्सवाच्या अध्यक्षा श्रीम. भाग्यश्री चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. मानपत्राचे वाचन श्रीम. दिपाली चौगुले यांनी केले. उपमुख्याध्यापिका मा. श्री. अर्चना पंच, पर्यवेक्षक श्री. दिलीप रावडे व श्री सुरेश वरगंटीवार यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी व पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक ऑनलाइन माध्यमाद्वारे उपस्थित होते.