पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलिटीज च्यावतीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन व मनोसामाजीक समाजकार्य विभागाने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन व सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला.
नुकतेच सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलिटीज चे अध्यक्ष सहा प्रा चेतन दिवाण व स्नेहालय संस्थेचे मनोसामाजीक कार्यकर्ते रमाकांत दोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर परिसरातील विविध रस्त्यांवर फिरणाऱ्या अनेक मनोरुग्णांना उचलून त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेमध्ये पुढील उपचार व पुनर्वसनासाठी पाठविण्यात आले.
तसेच महाविद्यालयामध्ये आज स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे, उपचारपद्धती व पुनर्वसन या विषयावर सहा प्रा चेतन दिवाण व सोहम माईंड पॉवर संस्थेचे डॉ सचिन पोतदार यां तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
या चर्चासत्रात संस्थेच्या व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच समुपदेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून चर्चासत्रात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. शर्मिला रामटेके या होत्या तर प्रा प्रियांका कुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती
संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर पाठक, सचिव एम.शिवकुमार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विनायक कराळे, श्री प्रसाद कोल्हटकर, डॉ. महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्किझोफ्रेनिया सप्ताह साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल पवार, मृण्मयी अस्वर,ओमकार तोरणे, माणिक शिरसाट, अलीशीबा वाकडे, अजिंक्य बोराटे यां विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी अस्वर यांनी केले व आभार अमित इंगळे यांनी मानले