पुणे- तत्कालीन खासदार सुरेश कलमाडींच्या पुढाकाराने नेहरू स्टेडीयम नजीक अनेकांचा विरोध आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात मोठ्या हिकमतीने उभे राहिलेले आणि लाखो रसिकांच्या करमणुकीचे केंद्र बनलेले पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच आता कोरोना च्या महामारीच्या काळात धूळ खात पडून राहण्याऐवजी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धाऊन येते आहे . ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून, डॉ.ऋतूपर्ण शिंदे आणि काही डॉक्टरांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि काही देणगीदारांच्या सहाय्याने महापालिकेच्या वतीने आता या गणेश कला क्रीडा मंचाच्या हॉल मध्ये १०० ऑक्सिजन बेड चे रुग्णालय उभे राहते आहे . या साठी येथे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ ,आयुक्त विक्रम कुमार , रुबल अगरवाल , प्रशांत वाघमारे शिवाजी लंके आदींनी पुढाकार घेऊन युद्धपातळीवर काम सुरु केले आहे त्यामुळे लवकरच हे १०० बेडचे ऑक्सिजन बेडचे रुग्णालय येथे सुरु होईल असे सांगण्यात येते आहे. यासंदर्भात पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट …