पुणे, 19 डिसेंबर 2021 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत उपांत्य फेरीत स्कायलार्कस, स्नोलेपर्ड्स या संघांनी अनुक्रमे जॅगवॉर्स व चिताज या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात इशांत रेगे(नाबाद 46 धावा व 1-5) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने जॅगवॉर्स संघाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना जॅगवॉर्स संघाने 6 षटकात 3बाद 95 धावा केल्या. यात कुणाल कासटने 17 चेंडूत 2चौकार व 6 षटकाराच्या मदतीने 53धावा, रवी कासटने नाबाद 28धावा केल्या. स्कायलार्कसकडून प्रसाद जाधव(2-12), इशांत रेगे(1-5)यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान स्कायलार्कस संघाने 5.5षटकात 4 गड्याच्या बदल्यात बाद 96धावा करून पूर्ण केले. यामध्ये इशांत रेगेने 16 चेंडूत 4चौकार व 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 46 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याला अनुज साबडे 20, अंकुश जाधव 19 धावा काढून साथ दिली. सामनावीर इशांत रेगे ठरला.
दुसऱ्या सामन्यात आश्विन शहा(2-8 व 21धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर स्नोलेपर्ड्स संघाने चिताज संघाचा 7 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
काल रात्री उशिरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इशांत रेगे(29 धावा व 2-12) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने टस्कर्स संघाचा 25 धावांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. तर, दुसऱ्या सामन्यात नचिकेत जोशी(नाबाद 16 व 1-16) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्नोलेपर्ड्स संघाने डॉल्फिन्स संघावर 2धावांनी विजय मिळवला.
निकाल: उपांत्य फेरी: जॅगवॉर्स: 6 षटकात 3बाद 95 धावा(कुणाल कासट 53(17,2×4,6×6), रवी कासट नाबाद 28(15,3×4,1×6), प्रसाद जाधव 2-12, इशांत रेगे 1-5) पराभूत वि.स्कायलार्कस: 5.5षटकात 4बाद 96धावा(इशांत रेगे नाबाद 46(16,4×4,4×6), अनुज साबडे 20, अंकुश जाधव 19, गौरव सावगावकर 2-14, रवी कासट 1-17);सामनावीर-इशांत रेगे; स्कायलार्कस संघ 4 गडी राखून विजयी;
चिताज: 6षटकात 8बाद 57 धावा(अनवीर नन्ना 16(9), शिरीष आपटे 8, योगेश भोंगळे 7, देव शेवाळे 2-11, नचिकेत जोशी 2-3, आश्विन शहा 2-8) पराभूत वि.स्नोलेपर्ड्स: 6 षटकात 1बाद 60 धावा(अक्षय ओक नाबाद 28(17,4×4), आश्विन शहा 21(15, 1×4,1×6), नचिकेत जोशी नाबाद 11(4,2×4), अक्षय कश्यप 1-9);सामनावीर-आश्विन शहा; स्नोलेपर्ड्स संघ 7 गडी राखून विजयी;
उपांत्यपूर्व फेरी: स्कायलार्कस: 6षटकात 6बाद 101 धावा(अनुज साबडे 35(10,4×4, 3×6), इशांत रेगे 29(12, 2×4,3×6), अंकुश जाधव 18, कल्पक पत्की 2-16, क्रिश कासट 1-8) वि.वि.टस्कर्स: 6 षटकात 3बाद 76 धावा(कर्ना मेहता 31(13,2×4,3×6), समीर बाकरे नाबाद 18(11,1×4,2×6), हर्षल गंद्रे 11, राहुल पाठक नाबाद 11, इशांत रेगे 2-12);सामनावीर-इशांत रेगे; स्कायलार्कस संघ 25 धावांनी विजयी;
स्नोलेपर्ड्स: 6षटकात 3बाद 69 धावा(अक्षय ओक 22(14,4×4), आश्विन शहा 18(11), नचिकेत जोशी नाबाद 16(4,2×4,1×6), देवेंद्र चितळे 1-7, रोहन छाजेड 1-8) वि.वि.डॉल्फिन्स: 6 षटकात 2बाद 67 धावा(अभिजीत गानू नाबाद 39(18,4×4,2×6), रोहन छाजेड 22(12,1×4,1×6), नकुल पटेल 1-11, नचिकेत जोशी 1-16);सामनावीर-नचिकेत जोशी; स्नोलेपर्ड्स संघ 2 धावांनी विजयी.