पुण्याच्या विभुती पांडेला ‘मिसेस वेस्ट इंडिया २०२० – सिल्व्हर विभाग‘चा प्रतिष्ठित किताब जिंकला, तेव्हा तिच्या आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिचा मंत्र ‘स्वत:वर विश्वास असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट थांबवू शकत नाही’ खरा ठरला. अथक मेहनत व समर्पिततेसह तिने ४७ फायनालिस्ट्समधून प्रतिष्ठित मुकुट जिंकला, ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२०‘ – सीझन ३ चा भव्य फिनाले यंदा २८ नोव्हेंबर २०२० रोजी अलिला दिवा गोवा, येथे आयोजित करण्यात आले. फक्त एवढेच नाही – तिच्या आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्वाने तिला त्याच व्यासपीठावर ‘मिसेस कॉन्फिडण्ट – सिल्व्हर विभाग‘चा उपकिताब जिंकण्यामध्ये देखील मदत केली.
पुण्यातील डॉएच बँकेची आर्थिक व्यवस्थापक असलेली ती हसत म्हणाली, ”मी लठ्ठ व्यक्तीपासून तंदुरूस्त व्यक्तीमध्ये बदलण्याचा निर्धार केल्यापासूनच माझा पेजीण्टसाठी प्रवास सुरू झाला. मी एका वर्षामध्येच माझे वजन २५ किग्रॅने कमी करण्यामध्ये यशस्वी झाली. माझ्या जीवनातील या परिवर्तनानंतर मी पेजीण्ट्रीसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. आणि माझ्या शोधाने मला अंजना व कार्ल मस्करेन्हास यांच्याद्वारे व्यवस्थापन व आयोजन केले जाणा-या दिवा पेजीण्ट्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये मदत केली. त्यांनी आयोजित केलेल्या लाभदायी व जीवनाला आमूलाग्र कलाटणी देणा-या सत्रांमध्ये उपस्थित राहत मी स्वत:हून माझ्यामध्ये अधिक सुधारणा केली आणि यासाठी मी नेहमीच त्यांची कृतज्ञ राहीन.”
महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतामधील लहान नगर गोंदियामध्ये राहणारे डॉ. दिलीप व संध्या पांडे यांची मुलगी असलेली विभुती लिंग समानता, महिला स्वप्न पाहत असलेल्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यास सहाय्य अशा कौटुंबिक मूल्यांसह मोठी झाली आहे आणि तिच्यामध्ये कधीच हार न मानण्याची वृत्ती बिंबवण्यात आली आहे. हैद्राबाद येथे फायनान्समध्ये एमबीए शिक्षण घेतल्यानंतर तिने आता पुण्यातील डॉएच बँकेमध्ये आर्थिक व्यवस्थापक म्हणून यशस्वी करिअर स्थापित केले आहे.
विभुती म्हणाली, ”अर्थातच, मुकुट जिंकणे हे माझे पती अमित यांच्या अविरत पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. ते एमएनसी येथे अभियांत्रिकी संचालक म्हणून काम करतात आणि माझे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत. तसेच माझा ११ वर्षाचा मुलगा वेदांत याचा पाठिंबा देखील मोलाचा आहे.” ती तिची धाकटी बहीण विधी आणि दीर अभिषेकला मित्र मानते. तिची पुतणी अर्चिशाने तिचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी तिची इच्छा आहे.
पर्यटनाची खूप आवड असलेल्या विभुतीला नवनवीन स्थळे, पाककला व संस्कृतींचा शोध घ्यायला आवडते. जवळपास अर्ध्या जगभरात प्रवास केलेल्या तिची उर्वरित जगामध्ये प्रवास करण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटनावर जाण्याची इच्छा आहे.
अधिक पुढे जात, तिची इतर महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आणि दिवा पेजीण्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणा-या इतर किताबांमध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे. तिचा विश्वास आहे की महिला जीवनामध्ये अनेक यश प्राप्त करतात, पण वैयक्तिक ओळख देखील राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विभुती म्हणते, ”तुम्ही दुस-यांच्या पावलांवर पाऊल टाकत राहिलात, तर तुम्हाला स्वत:चे असे यश कधी मिळणार?” खरेतर या पेजीण्टच्या यशानंतर विभुतीने स्वत:मध्ये अधिक सुधारणा करत २०२१ मध्ये दिवा पेजीण्ट्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पेजीण्टमध्ये सहभाग घेण्याची तयारी सुरू केली आहे, जेथे ती भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
तिचे कुटुंब सामाजिकदृष्ट्या अत्यंत जबाबदार आहे. ते नियमितपणे वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना भेट देतात. पण, विभुतीची या बाबीला अधिक पुढे घेऊन जात वृद्धाश्रम व अनाथाश्रम एकत्रित करण्याचा विचार आहे. ज्यामुळे वरिष्ठ नागरिकांना नातवांप्रमाणे असलेल्या अनाथ मुलांसोबत खेळण्याचा आनंद मिळेल आणि अनाथ मुलांना देखील आजी-आजोबांचे प्रेम मिळेल. हा अत्यंत थोर विचार आहे.
दि रोसरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विनय अरन्हा यांनी जहांगीर ओराकेअर डेण्टल सेंटरसोबत सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाला सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री माननीय मंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महक चहल (अभिनेत्री), ब्रूना अब्दुल्ला (अभिनेत्री), सुहानी मेंडोन्सा (इव्हेण्ट्स), ग्वेन डी (डिझाइनर), विवेक मेंडोन्सा (लॉरेन्स अॅण्ड मायो) हे प्रख्यात परीक्षक लाभले. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अमन यतन वर्माने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याने आत्मविश्वासासह या भव्य कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन केले.