पुणे- पुण्याला कोरोना पासून महिना दीड महिन्यात निश्चित दिलासा मिळेल असा विश्वास आज येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले ,पुण्याचा हिट रेट बाकी जिल्ह्यांपेक्षा जास्त नाही ,तपासण्या वाढल्याने पेशंट ची संख्या वाढताना दिसत आहेत . रुग्णालयांवर लोड वाढतो आहे पण आम्ही सर्वांना बेड मिळेल याचे नियोजन आम्ही करत आहोत . आज १०० बेड ज्यादा उपलब्ध झालेत . पुढे पुढे रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल १ ते दीड महिन्यात हि संख्या कमी होईल लवकरात लवकर पुण्याला कोरोना पासून दिला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .