पुणे : यंदाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संचालित महाराष्ट्र विद्यालयाचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. किरण रमेश गोरडे (९२.४० टक्के), ओमप्रसाद पांडुरंग खोडदे (८८ टक्के), विश्वजीत विठ्ठलसिंग जारवाल (८६ टक्के) यांनी विद्यालयात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक विष्णुदास गावडे यांनी विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत संस्थेच्या नावलौकिकात भर घातल्याचे रेडेकर यांनी म्हटले आहे.