पुणे : निवासी सोय असलेल्या हॉटेल आणि लॉज यांना शंभर टक्के क्षमतेसह, तर खासगी कार्यालयात तीस टक्के कर्मचारी उपस्थितीत ठेवून व्यवसाय सुरू करण्यास पुणे महापालिकेकडून बुधवारी (ता.२) परवानगी देण्यात आली. मात्र शहरातील शाळा, कॉलेज, खासगी क्लासेस, रेस्टॉरंन्ट (हॉटेल), चित्रपटगृहे जलतरण तलाव, व्यायामशाळा या मात्र तीस सप्टेंबरपर्यंत खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.केंद्र आणि राज्य सरकारकडून अनलॉक-4 ची नियमावली जाहीर करण्यात आली होती.त्यामध्ये हॉटेलसह सर्व सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु त्याबाबतचे आदेश पुणे महापालिकेकडून काढण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पुणे शहरात या सर्व गोष्टी कधी सुरू होणार यांची चौकशी होत होती. अखेर बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी अनलॉक-4 नियमावली जाहीर करण्यात आली.
हे सुरू राहणार
– निवासाची सोय असलेले हॉटेल व लॉज यांना शंभर टक्के परवानगी
– खासगी आस्थापना कार्यालयात तीस टक्के कर्मचारी वर्गासह सुरू करण्यास परवानगी
– आंतरजिल्हा वाहतुकीसाठी निर्बंध नाही, वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही.
– पीएमपी बसला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी
– शॉपिंग मॉल मधील थिएटर वगळून सुरू ठेवण्यास मान्यता
– रेस्टॉरंट (हॉटेल) मधून पार्सल सेवा सुरू ठेवता येणार
– सर्व प्रकाराचे मैदानी खेळ, व्यायाम यांना परवानगी
– ब्युटी पार्लर, केशकर्तनालय
हे बंद राहणार
– शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस
– चित्रपटगृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे
– रेस्टॉरंन्ट, जलतरण तलाव, बागा
– नाट्यगृह, सभागृह, बार
– सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम
– साठ वर्षांवरील आणि दहा वर्षांच्या आतील मुले यांना विनाकारण बाहेर पडण्यास बंदी
– मास्क वापरणे बंधनकारक