वरील उपाययोजेने शिवाय रस्ता रुंदीकरण करणे, निरुपयोगी ,विनावापाराचे फुटपाथ कडेला घेणे ,सर्व्हिस रोड काढुन टाकणे ,सायकल ट्रॅक हिडन करणेया गोष्टी केल्यानंतर पुणे-सोलापुर रोड ची वाहतुक कोंडीतुन सुटका होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास योगेश ससाणे यांनी व्यक्त केला
वाहूतक कोंडी फोडण्यासाठी -बीआरटीचे दुभाजक उखडून फेकले..शाब्बासकी देण्याजोगे काम सुरु
पुणे-बीआरटी ने मी म्हणजे पुणे म्हणविणाऱ्या ची सत्ता उलथवून लावली ,त्यानंतर आलेल्या सत्तेलाही धक्का दिला . करोडो रुपयांचा चुराडा करून बनविलेले बीआरटी मार्ग खाजगी वाहनांची गळचेपी करून कोंडीत भर घालताना वर्षानुवर्षे उघड्या डोळ्याने दिसत आहे.रस्ता कोणा एका वाहनासाठी नाही तो सर्वच वाहनांसाठी उपलब्ध आहे ,असे असताना पुणे- हडपसर मार्गावर बीआर टी साठी स्वतंत्र लेन ,सायकल मार्गासाठी स्वतंत्र लेन करून अन्य खाजगी वाहनांची गळचेपी केल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अखेर बीआरटी ला स्वतंत्र रस्ता देणारे दुभाजक नगरसेवक योगेश ससाणे यांच्या उपस्थितीत महापालिकेने उखडून टाकले आणि रस्ता सर्व वाहनांसाठी मोकळा केला . आता सायकल मार्गासाठी देखील येथे जागा अडवून ठेवल्याने ,आणि या जागेचा वापर, सायकली कोणी वापरत नसल्याने होतच नसल्याने ,वाहतूक कोंडीने मेटाकुटीला आलेले दुचाकीस्वार येथे अखेरीस घुसखोरी करून हा मार्ग वापरताना दिसत होते आता या सायकल मार्गाचे पद्धतशीर पणे उच्चाटन होईल असे दिसते आहे
याबाबत नगरसेवक ससाणे यांनी सांगितले कि,गेली जवळपास पावनेदोन वर्ष पुणे मनपा , वाहतुक शाखा यांच्या शी सततचा पाठपुरावा करुन अखेर अंशत: बिम काढण्याचे काम वाहतुक शाखा पोलिस निरिक्षक विभांडिक यांच्या उपस्थितीत करवून घेण्यास प्रारंभ केला , काल सुमारे ५०० मीटर चा बिम काढुन टाकण्यात आला आसुन पुढील काम दोन दिवसांत केले जाईल अशी माहिती ससाणे यांनी दिली