पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका उद्या ( गुरुवारी) पुणेकरांना बसणार आहे. पालिकेकडून वडगाव जलकेंद्र आणि विमान नगर आणि धोनोरी टाकीवरील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने सिंहगड रस्ता आणि नगर रस्ता परिसरात काहीभागात पाणी बंद असणार आहे.
दरम्यान, गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचे नियोजन एक आठवडा अधीच ठरलेले असतानाही पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आणि जनसंपर्क विभागाकडुन बुधवारी दुपारी ही माहिती देण्यात आली. त्यामुळे, आधीच नागरिकांना उन्हाळ्यात जादा पाण्याची गरज असताना आयत्या वेळी हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने नोकरदार वर्गास उद्या पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
शुक्रवार दिनांक ०६ मे रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
१) वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार,
दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
२) भामा आसखेड प्रकल्प :
i) विमाननगर टाकी परिसर :- संजय पार्क, संपूर्ण विमाननगर , म्हाडा कॉलनी, एस.आर.ए भाग कुलकर्णी गरेज भाग, यमुना नगर, दत्त मंदिर परिसर इ.
ii) धानोरी टाकी परिसर :- कमल पार्क, माधव नगर ,धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी
नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर,
सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क परिसर