पुणे- ऐन कोरोनाच्या काळात सभागृहातील चालू ऑनलाईन मुख्य सभा महापौरांच्या अँटी चेंबर मधून घेणाऱ्या पुणे महापालिकेने कोरोनाच्याच काळात रिलायन्स जिओ वर तब्बल ७२ कोटीची मेहेरबानी केल्याचा आरोप करत कोणा कोणाला किती किती कोटी मिळाले असा सावळ जर मी उपस्थित केला तर काय वावगे झाले असाही प्रश्न आज उपस्थित करून महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाला जोरदार दणका कॉंग्रेसचे माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिला आहे. आज शिंदे यांनी महापालिकेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत रिलायन्स वर केलेल्या ७२ कोटीच्या मेहेरबानी चा मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले,’रिलायन्स जिओ ने महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता यांना 18 नोव्हेंबर २०२० रोजी पत्र देऊन , आपण शहरात आपल्या परवानगीने ७०० किमी खोदाई करून ओएफसी केबल टाकलेल्या आहेत ,त्यातील ७० किमी च्या केबल २४ बाय ७ पाणीपुरवठा , एमजीएन एल , ड्रेनेज आणि एम एस ई डी सी एल च्या कामांमुळे खराब झाल्या असून त्यांची दुरुस्ती आम्ही स्वखर्चाने करू इच्छित असल्याचे कळविले .त्यास डिसेंबर मध्ये महापालिकेने कोणतीही शहानिशा न करता परवानगी दिली. यावेळी मुख्य सभा किंवा कसल्याही परवानगीची अगर कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही . प्रत्यक्षात या कामांविषयी आम्ही चौकशी आणि विचारणा सुरु केल्यावर मात्र तातडीने रिलायन्स जिओ ला काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. आमच्या निदर्शनास असे आले कि , या कंपनीने ७०० किमी परवानगी घेऊन केलेल्या कामात या ७२ किमी अंतराचा समावेश नव्हता आणि हे वेगळेच काम असावे तिथे या कंपनीने वेगळ्याच नव्या केबल टाकल्या असाव्यात . वास्तविक पाहता या ७२ किमी खोदाई साठी रीतसर असलेली रक्कम भरून त्यानंतर परवानगी घेऊन हे काम होणे आवश्यक होते पण तसे काही झालेले नाही . या मागे भाजपचा एक पदाधिकारी असल्याचे समजते असा आरोप करत शिंदे यांनी मुख्य सभा महापौरांच्या अँटी चेंबर मधून होत असल्याने अशा भ्रष्टाचारी वृत्ती फोफावत असल्याचा आरोप केला आहे. पहा याबाबत नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले ….