पुणे- हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमनाच्या नावाखाली पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या आक्रमक कारवायांनी पुणेकर हैराण झाले असून या कारवायांचा फटका आगामी निवडणुकीत भाजप स्नेला बसल्याशिवाय राहणार नसल्याचे नागरी प्रतिक्रियांमधून स्पष्ट होते आहे. शिवाय हेल्मेट सक्ती बद्दल सक्तीच्या समर्थन करणाऱ्या केलेल्या वार्तांकना मुळे हि प्रख्यात आणि विश्वासार्ह म्हणून गणल्या जाणाऱ्या काही माध्यमांवरही चौकाचौकातून नागरिकांनी पोलिसांपुढे नाराजी व्यक्त केली . जे पोलीस या माध्यमांच्या बातम्यांचा दुचाकीस्वारांना हवाला देऊ पाहत होते.
यावेळी वायरलेस मेसेज वरून रोज सातत्याने पोलिसांना येणारे कंट्रोल रूम मधील मेसेज पोलीस नागरिकांना ऐकवीत होते . या मेसेज द्वारे , आज रोजच्या पेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे असा आदेश रस्त्यांवरील पोलिसांना तासाला दिला जात होता .एकीकडे हेल्मेट विरोधी कृती समिती हतबल झालेली असताना दुसरीकडे पोलिसी कारवायांनी वेग घेतल्याचे आज दिसत होते. नागरिक भाजप सेनेच्या आमदार खासदारांची नावे घेऊन शिव्या शाप देत दंड भरताना दिसत होते … आम्ही इथे एक हलकीशी व्हिडीओ झलक देत आहोत ..एक पोलिस आधीकारी आणि दुचाकी स्वार महिला यांंच्यातील सं वाद …. कान देवून ऐका….