पुणे-शहरातील अनेक मंडळांनी यंदा ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रबोधनात्मक अशा जिवंत देखाव्यांमधून हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.
जिवंत देखाव्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांचा वयोगट साधारणतः १५ ते ६० वर्षांपर्यंतच आहे. मंडळांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार नाट्यसंस्थांनी त्यांना नेपथ्यासह जिवंत देखावा बसवून दिला आहे. कलाकारांच्या वयानुसार आणि अनुभवानुसार मानधन दिले जात आहे.
गोखले नगर मधील पावन मित्र मंडळाने ‘नटखट हनुमान रथ’ हा देखावा सादर केला आहे
एरंडवणे मित्र मंडळाने सादर केलेला ‘श्री स्वामी समर्थ प्रकट दिन’ हा हलता देखावा आकर्षण ठरत आहे.दीप बंगला चौक येथे श्री गुरुदत तरुण मंडळराने ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुशासन’ हा जिवंत देखावा सादर केला आहे.
गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा रोषणाईतून तयार केलेला कोलकता येथील चंद्रिकामाता मंदिराचा देखावा सदर केला आहे
अरण्येश्वर येथील गवळीवाडा मित्र मंडळाने प्रबोधानत्मक जिवंत देखावा सदर करण्यावर भर दिला आहे .
बिबवेवाडी येथे अंकुश मित्र मंडळाने बनवलेली वाघावर बसलेल्या देवीची भव्य प्रतिकृती सदर केली आहे
पर्वती येथे नवनाथ मित्र मंडळाने बालगणेशाचा शिवलिंग पूजेचा देखावा सदर केला आहे
मार्केट यार्ड मधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मंडळाने जेजुरी गडावरील खंडोबाचा देखावा सादर केला आहे