‘पुणे फेस्टिव्हल ‘ मध्ये ६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मुशायरा
पुणे : ‘पुणे फेस्टिव्हल ‘ मध्ये ६ सप्टेंबर रोजी उर्दू ,हिंदी शेरोशायरीचा आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आला आहे ‘अवामी महाज’ सामाजिक संस्था आणि इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र(स्वारगेट) येथे होईल. ‘अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि सलोख्याचे प्रतीक मानले जाते .
या कार्यक्रमात राज्याचे माजी अल्पसंख्यक विकास मंत्री मोहमद अरिफ नसीम खान यांच्या हस्ते ‘लाईफ टाइम अचिव्हमेंट ‘ पुरस्कार आणि ‘फक्र -इ -महाराष्ट्र ‘ पुरस्कार दिले जाणार आहेत.
पॉप्युलर मेरठी(मीरत),मंझर भोपाली(भोपाळ),इक्बाल अशर(दिल्ली ),अफरोज आलम(दुबई),अतुल अजनबी (ग्वाल्हेर),रियाझ सागर (मुझफ्फर नगर ),शाहीद अदिली (हैद्राबाद),शाईस्ता सना(कानपूर),डॉ मुमताज मुनव्वर (पुणे),अंजली अदा(काश्मीर),रेहाना शाहीन (अलीगड),शर्फ नानपर्वी(दिल्ली) हे शायर कवी सहभागी होणार आहेत .डॉ मेहताब आलम(भोपाळ) हे सूत्रसंचालन करणार आहेत.
मुशायऱ्याच्या आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ परवेझ इनामदार,डॉ मुश्ताक मुकादम ,वाहिद बियाबानी ,इम्तियाझ मुल्ला ,प्रा . उझ्मा तस्नीम यांचा समावेश आहे