पुणे – व्यक्तीमत्व, बुद्धीमत्ता, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान आणि जीवनाबद्दलचा दृष्टीकोन अशा सर्वंच बाबींमध्ये आघाडी घेत निहारिका दुबे हिने यंदाचा मिस पुणे फेस्टिव्हलचा बहुमान मिळवला. श्रावणी पोमण हिने दुसरा क्रमांक पटकावतानच ती फेव्हरिटही ठरली, तर याज्ञी नवाथे हिने तिसरा क्रमांक मिळवला. मिस पुणे फेस्टिव्हल ठरलेल्या निहारिका दुबे हिला अभिनेता आणि मॉडेल अभ्यंग कुवळेकर आणि फॅशन तज्ञ कमरताज पठाण मुकुट यांनी प्रदान केला. मिस पुणे फेस्टिव्हल निहारिका आणि साक्षी गोडसे यांना मिस कूबा इंटरनॅशनल स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश मिळणार आहे. मिस पुणे फेस्टीव्हल सौंदर्य स्पर्धेचे संयोजन सुप्रिया ताम्हणे यांनी केले होते. या सर्व स्पर्धकांसाठी ग्रुमिंग मेंटर व फॅशन कोरियोग्राफर म्हणून जुई सुहास यांनी काम पाहिले.
मिस पुणे फेस्टीव्हल स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाशिवाय युवा कांक्रीया हिचे हास्य सर्वाधिक मोहक ठरले. साक्षी गोडसे हिला बेस्ट हेअर, वैष्णवी हेमाडे बेस्ट टॅलेंट, स्टेफी शाजी मिस फोटोजनिक आणि श्रावणी पोमण फेव्हरीट ठरली. यंदाच्या ३१ व्या पुणे फेस्टिव्हलमधील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेची अंतिम फेरी आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाली. यावेळी पुणे फेस्टीव्हलच्या संयोजनक समितीचे डॉ. सतीश देसाई, अभय छाजेड, काका धर्मावत, रवींद्र दुर्वे, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे, दिपाली पांढरे, संयोगीता कुदळे आणि संतोष कांबळे आदी उपस्थित होते. अंतिम फेरीसाठी दहा जणींची निवड करण्यात आली. सन 2018 ची पुणे फेस्टीव्हल फर्स्ट रनरअप काव्या जोशी हिने श्रावणीला तर 2018 ची दुसरी रनर अप ठरलेल्या सिमरन नायक हिने मुकुट याज्ञी नवाथे हिला प्रदान केला. अंतिम फेरीत निवड झालेल्या 10 जणींना पुण्यातील तरूणींच्या खासियत बद्दल समायिक प्रश्न विचारण्यात आला होता.
या सौंदर्य स्पर्धेत .आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्वाचे पैलू व हजरजबाबीपणा, सर्वसामान्य ज्ञान व सामाजिक दायित्व या पैलूंवर भर देण्यात आला होता. रॅमवर चालणे, हसणे यांना विशिष्ट्य गुण देण्यात आले. स्पर्धेचे फोटोग्राफर अश्विन कोडगुले तर ड्रेस डिझायनर अनुपम जोशी होते. परिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीच्या तज्ञ गीता कॅस्टिलिनो, अभिनेता मॉडेल अभ्यंग कुवळेकर, फॅशन तज्ञ कमरताज पठाण, प्रसिद्ध ग्रुमिंग तज्ञ लवेल प्रभू आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रुती मंगेश यांनी काम पाहिले. या जजेससाठी डिजिटल पार्टनर सी वर्ल्ड यांनी खास अॅप बनवले होते.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पाकिझा संकल्पनेवर आधारित वेषभूषा धागा बुटीकचे अनुपम जोशी यांनी खास ड्रेस तयार केले होते. दहा अंतिम स्पर्धकांसाठी बॉलरूम गाऊन्स आकार बाय कांचन यांनी दिले होते. ग्लॅम क्यू सलोन अॅन्ड स्पा, करण डी हायड्रेटेड फ्रुटस् डिवाईन लव्ह, डेंटल वर्ल्ड यांनी पारितोषिके दिली होती. मिस पुणे फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीची आयएसएएस यांचे मेक उप व हेअर स्टाईल तर डेंटल वर्ल्ड दिवाईन लव, ग्लॅम क्यू पार्लर,एथनिक अशा नामवंत ब्रॅण्डसच्या सहयोगाने स्पर्धेची रंगत आणि चुरस वाढवली.
स्पर्धेचे यंदाचे 7 वे वर्ष असून यापूर्वीच्या या स्पर्धेतील विजेत्या राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. या युवतींना ८ दिवस रॅम्प वॉकचे प्रशिक्षण दिले गेले. याबरोबरच सर्व स्पर्धकांचे डेंटल वर्ल्ड तर्फे दन्त चिकित्सा केली गेली. मॉडेलिंग मधील करीयर या विषयावर आंतरराष्ट्रीय किर्तीच्या तज्ञ गीता कॅस्टिलिनो यांनी व्याख्यान दिल. या युवतींचे फोटोशूट क्रिएटि सिटी मॉल मध्ये युवतींचे फोटोशूट झाले. योग्य आहाराबाबत आहार तज्ञ डॉ. अवंती दामले यांनी मार्गदर्शन केले.
यावर्षी 150 युवती सहभागी झाल्या होत्या. त्यातून २० युवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे त्यातून अंतिम ३ विजेत्या निवडण्यात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन अगरवाल यांनी केले. वर्ज्य डान्स ग्रुपच्या नृत्यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. अंतिम फेरीसाठी तरूणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत टाळ्या कडकडाटात ते प्रत्येकीला प्रोत्साहनही देत होते.