आज झालेल्या महापौर,आयुक्त व सर्व पक्षीय बैठक आबा बागुल यांची मागणी
पुणे-
शहरात कोरोनाने थैमान घातले असून त्यावर उपाय योजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड व इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून यावेळी पुणेकरांसाठी आदरणीय पुनावाला यांनी जगात किंवा देशात कोठेही लसीचे वितरण करावे परंतु पुणेकरांना विनामूल्य लस उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी केली त्यावर महापौर आयुक्तांसह सर्व पक्षीय गटनेत्यांनी त्यास मान्यता दिली असून दोन दिवसांत महापौर,आयुक्त व सर्वपक्षीय गटनेते त्यांची भेट घेऊन त्यांना मागणी करणार असल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले.