स्पर्धेत टिकण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती हवी – प्रा.डॉ.गजानन एकबोटे
पुणे-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.शरद कुंटे प्रमुख पाहुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संस्थेच्या उपकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मनपा पुणे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे,व्हिजिटर उद्धव खरे,श्याम हर्षे,पर्यवेक्षिका सीमा कुळधरण,शिक्षक प्रतिनिधी कांचन गवारी,विद्यार्थी प्रतिनिधी कु.रोहित चौरे उपस्थित होते.वर्षभरात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता लकारे,परिचय उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे आणि नवेश पाटील यांनी केला.
प्रसंगी प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले की,शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे शिक्षक हे विद्यार्थ्यांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतात. त्यांच्यामुळेच उत्तम व चांगले नागरिक निर्माण होतात.तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्या म्हणजे ते आनंदी शिक्षण घेतील.सकाळी रोज लवकर उठून देवाची प्रार्थना केल्यास मन प्रसन्न होते आणि दिवस चांगला जातो.नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक गोष्टी टाळा. यशाने हुरळून जाऊ नका.अपयशाने खचून जाऊ नका. असा संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.प्रमुख पाहुणे प्रा.कुंटे यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.ज्ञान,कर्म आणि भक्ती या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सादर केले शिवराज्याभिषेक,जोगवा,शंकरा रे शंकरा,इडा पिडा टळु दे, भांगडा,मोबाईलचे वेड असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आली.या कार्यक्रमास विशेष उपस्थिती माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक यांची लाभली.संस्थेच्या नियामक मंडळ सदस्या आणि प्रशालेच्या माजी शिक्षिका मृगजा कुलकर्णी यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ असलेला पुरस्कार प्रशालेचे शिक्षक विकास पवार यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी वाचन ईशानी ढेरेआणि अरुंधती पिंगळे,पी.पी.टी.वाचन नवेश पाटील,सूत्रसंचालन वंदना सोनोने तर आभार कांचन गवारी यांनी मानले.विद्या वाईकर यांनी पसायदानाने सांगता केली.कार्यक्रम उत्साहात पार पडला.