पुणे, दि. ०४ मे २०२२: ‘गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ व दोन्ही चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे अभियंते व कर्मचारी हे सुरळीत वीजपुरवठा तसेच ग्राहकसेवेसाठी अत्यंत खडतर व आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावीत आहेत व त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे’, असे गौरवोद्गार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना काढले.
सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या पुणे परिमंडलमधील उत्कृष्ट १३ यंत्रचालक व ४४ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री प्रकाश राऊत, सतीश राजदीप, सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. भागवत थेटे, श्री. विजेंद्र मुळे यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट ५७ जनमित्रांना गौरविण्यात आले.
पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे – गोपीनाथ शेळके, अनिल येवले, दत्तात्रय चव्हाण, मुरलीधर मुठे (बंडगार्डन विभाग), स्वप्निल जगदाळे, सतीश उंडे, एकनाथ साबळे, दिलीप चव्हाण (नगररोड विभाग), तानाजी शेंडकर, किशोर मस्के, उमेश मिसाळ, गणेश बिडवे, (पद्मावती विभाग), पंडित शिंदे, सत्यवान दराडे, सोनाली विश्वकर्मा, चेतन जाधव (पर्वती विभाग), इरफान मोहम्मद, अजित हांडे, सोमिनाथ कळम, विजय भोसले, राहुल आरुडे (रास्तापेठ विभाग), सुभाष जुंबळे, सिद्धांत गणोरकर, ज्ञानेश्वर मते, कृष्णा आरुडे (भोसरी विभाग), शिल्पा जाधव, अंकुश खुडे, श्रीनिवास दौंड, एकनाथ भाकडे (कोथरूड विभाग), अमीर देवर्षी, राहुल चव्हाण, सुरेश पाटोरकर, बद्रिनाथ जाधव (पिंपरी विभाग), अनिल फाळके, सुनील शेळके, सुदर्शन मुंडे, सिद्धेश घुले, (शिवाजीनगर विभाग), सोमनाथ चव्हाण (गणेशखिंड चाचणी), बंडू नांगरे, अमित महाजन, बाळकू कवटे, राजेश आव्हाड, शिवाजी वाघमारे, शिवाजी लोहकरे (मंचर विभाग), उमेश खोमणे, कैलास सरोगदे, सचिन जावळकर, राजेंद्र खरात, संपत चौधरी (मुळशी विभाग), सोमनाथ जंगले, अमृता चौधरी, अवधुत गिरी, रामकृष्ण मांजरे, दिनेश आगळमे, संभाजी येवले, महेश दरेकर (राजगुरुनगर विभाग)