पुणे-३४ व्या पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे निश्चित झाले असून , श्री गणेश
कला क्रिडा रंगमंच बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यग्रुह येथील सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य
क्रीडा स्पर्धा यांची निश्चिती झालेली असून, प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगीत तालमी लवकरच सुरू
होत आहेत . याबद्दल पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी, पुणे फेस्टिव्हलच्या आजच्या
बैठकीत समाधान व्यक्त केले. सर्व समित्यांच्या प्रमुखांनी आपल्या कामाचा आढावा या बैठकीत घेतला. श्री
गणेश कला क्रिडा रंगमंच येथे मुख्य कार्यक्रमांच्या द्रुष्टीने आवश्यक सोयी-सुविधांच्या संदर्भातील प्रत्यक्ष
पाहण्याची माहिती देखील त्यावेळी बैठकीत देण्यात आली. निमंत्रणे,पासेस,कार पासेस, इव्हेंट कॅलेंडर, इ.
चे डिझाईन या बैठकीत अंतिम झाले. पुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी पुण्यातील अनेक
नृत्यालये व संस्कृतिक संस्थानी मोठा प्रतिसाद दिला आहे.या बद्दल या बैठकीत सुरेश कलमाडी यांनी
समाधान व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळा देखील नेत्रदीपक व वैविध्यपूर्ण कलाविष्कार
सादर करणारा असेल.असे कार्यक्रम यंदाही असल्याचे सांगून, पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनात पुणेकरांचा
सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.असे चित्र आजच्या बैठकीत दिसून आले.मिस पुणे फेस्टिव्हल ,मिसेस
पुणे फेस्टिव्हल, पाक कला स्पर्धा, नृत्त्य स्पर्धा, मंगळागा्ैरीचे खेळ स्पर्धा,पेंटिग स्पर्धा ,महिलांसाठी स्पेशल
लावणी शो, गायन स्पर्धा; अशा स्त्रीप्रधान अनेक कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटातील पुणेकर महिलांचा
सहभाग वाढला आहे याची विशेष नोंद या बैठकीत घेण्यात आली.तसेच अनेक नविन तरूण कार्यकर्ते पुणे
फेस्टिव्हलच्या संयोजनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत याबद्दल सुरेश कलमाडींनी या बैठकीत
आनंद व्यक्त केला.पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,उपाध्यक्ष सुभाष सणस हे बैठकीत
उपस्थित होते.