पुणे-कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर ,
द हिंदू फाउंडेशन , स्कील्लेट्झ फाउंडेशन आणि श्री समर्थ बचत गट यांच्या वतीने
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आणि स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त केक प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओ बी सि आघाडी चे अध्यक्ष योगेश पिंगळे आणि भाजपा पुणे शहर व्यापारीआघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास आणि भाजपा पुणे शहर प्रवक्ता आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू यांच्या यांच्या हस्ते झाले .यावेळी भाजप उपाध्यक्ष आणि प्रवक्ते धनंजय जाधव म्हणाले की, कोरोनाच्या या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे छोटे , मोठे व्यवसाय, रोजगार बुडाले, पगार बंद झाले . याच दरम्यान कित्येकांच्या घरातील करती माणसे मरण पावली, कित्येक जण अनाथ झाले ,त्यामुळे आणि कित्येक लोकांच्या समोर जगण्यासाठी घरात बसून स्वयंरोजगार मिळवण्याचा आणि करण्याचा पर्याय उभा राहिला,त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि द हिंदू फाउंडेशन च्या वतीने महिलांना घरच्या घरी उद्योग आणि स्वयंरोजगार निर्माण कसा करता येईल तसेच महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अशा स्वयंरोजगार निर्मिती साठी पुढे यावे, आणि याच विचारातून केक प्रशिक्षण स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे म्हणाले , कोरोनाच्या या सर्व काळात भाजपचा कार्यकर्ता हा जनतेच्या मदतीसाठी रोडवर उतरला होता , आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांना केक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून महिलांना रोजगार निर्माण करून देण्याचा उपक्रम नक्किच स्तुथ्य उपक्रम आहे. त्यामुळे महिलांनी या उपक्रमातून व्यावसायिक व्हावे.
भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष महेंद्र व्यास म्हणाले की, भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने या उपक्रमाला जी जी मदत लागेल ती आम्ही करू, आणि महिलांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी सहकार्य करू.चार्टर्ड अकौटंट सोनाली सारीपल्ली, आणि डॉ. श्रुती कलारन्स यांचेही यावेळी भाषणं झाली.प्रभाग क्र २८ नवी पेठ मधील २०१ महिला युवतींनी या वर्गात नोंदणी केली आहे.
सोमवारी या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून रोज सहा बॅच मधून २०१ महिला युवतींना प्रशिक्षित शिक्षकांच्या कडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे,
रोज दोन तास , पाच दिवस हे प्रशिक्षण होणार आहे , या प्रशिक्षनात सर्व प्रकारचे केक शिकवणार आहे.२१००/- रुपये फी असलेला हा केक प्रशिक्षण वर्ग फक्त २०१/- रुपये नाममात्र फी मध्ये दिला जात आत आहे. यात सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पुणे शहर भाजपा ओ बी सी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, सरचिटणीस ओंकार माळवदकर, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष महेंद्र व्यास, भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडी सरचिटणीस कांचन कुंबरे, दादरा नगर हवेली स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक अरविंद मनोलकर, भाजपा झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार, भा ज यु मोर्चा कसबा अध्यक्ष अमित कंक, भाजपा रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, डॉ. मिताली मोरे, डॉ. श्रुती क्लारन्स हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव , स्किल्लेट्झ फाउंडेशन च्या सोनाली सारीपल्ली, स्वामिनी बचत गटाच्या सीमा शिंदे, आणि श्री समर्थ बचत गटाच्या वनीता सोपे यांनी केले.सूत्रसंचालन नम्रता कामत यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी मानले.