पुणे : लॉकडाऊन संपेपर्यंत भुकेशी लढणा-या नागरीकांसाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) आणि युवक क्रांती दल (युक्रांद)तर्फे १ एप्रिलपासून १८ मे अखेर पर्यंत सुरू असलेल्या मदतकार्याने ३५०० हून अधिक किराणा सामानाच्या किट्स वाटपाचा टप्पा पुर्ण केला आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, युक्रांद आणि गांधी भवन) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
लॉकडाऊन मुळे अडकलेले प्रवासी श्रमिक, पुणे शहरातील वस्त्यांमधील अडचणीतील नागरीक, तृतीय पंथीय, वेश्याव्यवसायातील स्त्रिया,गरजुंना आणि जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण १० लाख खर्चून किराणा सामानाची मदत देण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन) आणि युवक क्रांती दल (युक्रांद) ने समाजातील विविध घटकांकडून निधी संकलन केले.
अन्नपुर्णा संस्थेने या मदतकार्यासाठी १०० किट्स दिले. मशाल, रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी, सृष्टी सांस्कृतिक संस्था, जीवन संस्था,भारतीय समाज विकास व संशोधन संस्था,हेल्पींग हॅन्ड -दिघेमावशी परिवार,व्ही एम सॉफ्ट वेअर,आर जे संग्राम,समता सैनिक दल,सहेली संस्था,अन्नपुर्णा संस्था (मेधाताई सामंत),युनियन बँक अशा अनेक संस्था आणि व्यक्तींनी या मदत कार्यासाठी मदत केली. सचिन चौहान,संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,मुख्तार मणियार,सचिन पांडूळे,अप्पा अनारसे, रवी लाटे, सुदर्शन चखाले यांनी मदत कार्याचे संयोजन केले.या मदत कार्यासाठी चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या नावाने द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने श्रमिकांना आपल्या गावी परतण्यासाठी रेल्वे आणि इतर सोयींची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी काही दिवस लागतील. तोपर्यंत किराणा सामान वाटप अखंड चालू ठेवण्याचा निर्धार या संस्थांनी केला आहे.
गांधी भवनच्या संवाद समुपदेशन केंद्राची मदत
लॉकडाऊन काळात ताणतणाव आणि समस्यांसंदर्भात समुपदेशनाची आवश्यकता असल्याने गांधी भवन कडून समुपदेशनाची सेवा सुरु करण्यात आली आहे.एड प्रभा सोनटक्के यांच्याशी मोबाईल नंबर 9823624094 वर संपर्क साधता येईल.
आर्थिक मदतीचे आवाहन
या कार्यात सहभागी होण्यासाठी किमान रूपये ३००/- देणगी पाठवावी, ही विनंती. ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे किराणा सामान देता येते,या अनुमानानुसार हे आवाहन करण्यात आले आहे.
देणगी गांधी भवन खात्याचे तपशील
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code SBIN0020734
चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.