पुणे :
कोरेगाव पार्क भागात पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी पालिकेकडून खरेदी केलेल्या भूखंडावर विकसित केलेल्या इमारतीमध्ये ११ सदनिका देण्याचा करार असतानाही फक्त २ सदनिकांचा ताबा देवून उर्वरित सदनिका घशात घालणाऱ्या,मारहाण -जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या न्याती डेव्हलपर्स , नदीम परिहार, सलीम परिहार विरुद्ध दाखल गुन्ह्यात नितीन न्याती यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १३ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात पहिली सुनावणी झाली.२४ तारखेला पुढील सुनावणी होईल .
प्रकरणातील पीडित सुरेश सारवान,युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सारवान यांच्पा वतीने अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.
प्रकरणाची पार्श्वभूमी
कोरेगाव पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी२०२० रात्री तक्रार दाखल करण्यात आली होती .ही तक्रार दाखल करण्यास डिसेंबर २०१९ पासून टाळाटाळ केली जात असल्याने युवक क्रांती दल राज्य संघटक जांबुवंत मनोहर ,झाशीची राणी प्रतिष्ठान च्या अध्यक्ष एड रुपाली पाटील -ठोंबरे आणि या प्रकरणातील पीडित सुरेश सारवान यांनी बुधवारी दुपारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश सारवान यांच्यावरील अन्यायाला२७ फेब्रुवारी रोजी वाचा फोडली होती.
कोरेगाव पार्क भागात पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी पालिकेकडून १९९५ मध्ये खरेदी केलेल्या भूखंडावर पुण्यातील नदीम परिहार, सलीम परिहार यांच्या सह न्याती डेव्हलपर्स यांनी कोरेगाव पार्क हद्दीतील टीपी संगमवाडी पुणे स्कीम फायनल प्लॉट क्रमांक ३०२ या जागेवर विकसन करार करून गृह प्रकल्प उभारला होता . मागासवर्गीय असल्याचे माहित असल्याने फ्लॅट न देऊन मागासवर्गीय असल्याने जातीवाचक शिवीगाळ करत मागासवर्गीयांची फसवणूक करत पट्ट्याने मारहाण करून डोक्याला रिव्हॉल्वर लावत जीवे मारण्याची धमकी देत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी केला . याबाबत सुदेश बाबूलाल सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न करून ती दाखल होत नव्हती .जांबुवंत मनोहर यांच्या प्रयत्नाने अखेर बुधवारी रात्री विकासकाविरुद्ध तक्रार दाखल झाली .
नितीन न्याती या बिल्डर सह नदीम परिहार व सलीम परिहार यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला
त्या अनुषंगाने कोरेगाव पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला
२६ फेब्रुवारी २०२० च्या पत्रकार परिषदेचा वृत्तांत*
मागासवर्गीयांच्या सदनिका बळकावणाऱ्या विकसकावर पोलीस कारवाईस टाळाटाळ
……………….
शिवीगाळ ,मारहाणी नंतरही एट्रोसिटीचा गुन्हा दाखल नाही :पीडितांची कैफियत
पुणे:
कोरेगाव पार्क भागात पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी पालिकेकडून खरेदी केलेल्या भूखंडावर विकसित केलेल्या इमारतीमध्ये ११ सदनिका देण्याचा करार असतानाही फक्त २ सदनिकांचा ताबा देवून उर्वरित सदनिका घशात घालणाऱ्या विकसकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोरेगाव पोलीस ठाण्यात दिरंगाई होत असल्याची कैफियत पिडीतानी पत्रकार परिषदेत मांडली.
या प्रकरणातील पिडीत सुरेश सारवान ,युक्रांद चे राज्य संघटक जांबुवंत मनोहर ,रुपाली पाटील -ठोंबरे आणि सहकाऱ्यांनी ही कैफियत पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली. हे पिडीत युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांना भेटल्यावर त्यांनी पिडीताना न्याय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या .
कोरेगाव पार्क येथील मिळकत क्रमंक ३७४ अ ही २१६०० चौरस फुटाची मोकळी जागा पुणे पालिकेने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी १९९५ मध्ये दिली होती. वाल्मिकी मेहतर समाजाच्या या कर्मचाऱ्यांकडे विकसनासाठी पैसे नसल्याने त्यांनी नितीन न्याती(न्याती डेव्हलपर्स) बिलाल परिहार ,निसार पठाण यांच्यासमवेत करारनामा केला .तेथे कॅसिया कोर्ट ही इमारत बांधण्यात आली.
त्यानुसार ३ वर्षात ३२ पैकी ११ सदनिकांचा ताबा या मागासवर्गीय कर्मचार्यांना मिळणार होता .प्रत्यक्षात दोनच सदनिकांचा ताबा देण्यात आला.उर्वरित सर्व सदनिका न्याती डेव्हलपर्स आणि नदीम परिहार ,सलीम परिहार या साथीदारांनी बेकायदेशीर रित्या ताब्यात ठेवल्या . आजही सदनिकांची मालकीविषयक सर्व शासकीय कागदपत्रे या पीडितांच्या नावे आहेत.
आजही हे पिडीत तक्रारदार बेघर आहेत .विचारणा करायला गेल्यास वारंवार मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याने पिडीतानी डिसेंबर २०१९ मध्ये कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला .पट्ट्याने मारहाण ,रिव्होल्व्हर डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली गेली .’तुम्ही संडास धुणारी माणसे आहात .तुमची येथे राहण्याची लायकी नाही ‘’ असे सांगून मारहाण केली जात होती .मात्र त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.आर्थिक फसवणूक ,जातीवाचक शिविगाळीबद्दल एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या पिडीतानी केला .मात्र कोरेगाव पार्क पोलिसांनी आजपर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही .युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर यांनीही पोलिसांची भेट घेवून कारवाईची लेखी मागणी केली .तरीही दखल घेतली गेली नाही .
या सदनिकांवर वेश्या व्यवसाय असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आली होती .त्यावरही कारवाई करण्यात आली नाही .
जांबुवंत मनोहर म्हणाले ,’ मागासवर्गीयांच्या सदनिका बळकावूनदेखील विकसकावर पोलीस कारवाईस टाळाटाळ पुण्यासारख्या शहरात केली जाते .शिवीगाळ ,मारहाणी,आर्थिक,मानसिक प्रताड्ना हे सर्व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास येवू शकणारे प्रकार आहेत .मात्र ,पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले नाहीत .ही अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे .:पीडितांची कैफियत ऐकून तातडीने कारवाई झाली नाही ,तर आंदोलन केले जाईल .’
यावेळी युक्रांद चे कार्यवाह संदीप बर्वे, शहराध्यक्ष सचिन पांडुळें, अप्पा अनारसे उपस्थित होते.