पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘ च्या वतीने आयोजित ‘सायन्सीफाय’ २०२० या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गरवारे बालभवन च्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट’ चे संचालक डॉ. ऋषी आचार्य यांच्या हस्ते झाले. २८ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला. आविष्कार इंडिया आणि मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आझम कॅम्पस येथे पार पडली.