बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा: लोकजनशक्ती पार्टी
पुणे:
लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर,जिल्हा पक्षाच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी रोजी पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘ बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा’ ही मागणी करण्यात आली.
लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.
ईमारत बांधकाम कामगार हे मराठी बरोबरच उत्तर भारतीय कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या कामगारांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना शासकीय योजनांमध्येही सामावुन घेतले पाहिजे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडील विविध प्रकारच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आणि बांधकाम कामगार पर्यंत योजनांची माहिती मिळाली पाहिजे आणि ते मिळणे गरजेचे तर आहेच तसेच त्यांच्या हिताचेही आहे असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते यानी शासनाच्या तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.यावेळी दिपक भडके, राहल उभे, सुरेश सहानी, के.सी. पवार, रजिया(भाभी) खान, राहूल कुलकर्णी, प्रमोद राजगुरू, आप्पा भोसले, दामू चौधरी,सविता रणदिवे, उज्वला कांबळे, लता आवळे, वैशाली वाघमारे, कमल देडे,समिरा शेख, जया मोरे, हिमेश परिहार, महादेव काटे, राधेशाम साहनी,छोटेलाल साहनी, जय भारत निवाद, राजु ठाकुर, राहुल शळके, परमजीत कुमार,श्रीनाथ अडागळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.